March 23, 2026

वाळूजमहानगर (ता.05) – वाळुज येथील मे बाळकृष्ण इंडस्ट्रीज या टायर बनवणाऱ्या कंपनीत सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कामगार व कर्मचारी अशा 270 जणांनी शुक्रवारी (ता.3) रोजी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

वाळुज औद्योगिक वसाहतीतील मे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. ही कंपनी नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत असते. या कंपनीतील कामगार, कर्मचारी तसेच मे. बाळकृष्ण टायर्स संघटना हे सातत्याने मागील 16 वर्षापासुन विविध सामाजिक उपक्रम राबवितात. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोधार यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन शुक्रवारी (ता.3) रोजी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. यात 270 कामगार व कर्मचाऱ्यांनी या शिबीरात उत्सफुर्तपणे रक्तदान केले.
घाटी रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदानात डॉ. अनूप्रीता कुलकर्णी, डॉ. पुजा शिंदे, जनसंपर्क अधिकारी सुनिता बनकर, अनुसया घोगरे व नंदबोदी पगारे आदिनी रक्त संकलन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे युनीट हेड के. व्यंकटरमण आणि स्वप्नील व्यास यांनी रिषीन कापुन केले. यावेळी कंपनीचे अजय गुप्ता, व्ही. एम. पाठक, बी. एस. पाठक, के. शशीधरण, महेश कुलकर्णी, पियुष सोनी, सुधाकर पांचाळ, जगदीश प्रजापती, आर. के. कुलकर्णी, मुकेश गुप्ता, ए. एस. शेळके, बि. डी. खैर तसेच बाळकृष्ण टायर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष बि. बि. जाधव, उपाध्यक्ष के. एच. शिंदे, सचिव आर. पी. बनसोड, संघटनेचे एस. जी. राठोड, बि. एल. गाडे, एन. बि. शिंदे, एस. डी. गोरे, सुनिल मेरड व आर. व्ही. भुतकर यांच्यासह कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आबासाहेब वाघमारे, चंद्रकांत भालेराव, खालेद खान, सुशील झाल्टे, बी. बी. निकम, मंगेश तांबडे, व्हि. एम. कस्तुरे आर. एम. पाटील, विजय जैन यांनी विशेष परिश्रम केले.

म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन
सध्याच्या धावपळीच्या जगात विविध संकटां सामोरे जावे लागते. शिवाय रोड अपघात, मलेरीया, हिमोफिलीया, थायलेसीमिया, डेंगु अशा अनेक आजारांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. या कारणांमुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे व रुग्ण, रूग्णांचे नातेवाईकाना रक्त मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्या येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात येते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *