February 5, 2026

वाळूजमहानगर (ता.03) – ग्रामपंचायत कार्यालय वळदगावच्या वतीने गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना सन 2023-2024 या आर्थिक वर्षाचे प्रत्येकी 7 हजार 500 रुपये प्रमाणे दिव्यांग निधीचे धनादेश वाटप शुक्रवारी (ता.3) रोजी करण्यात आले.

ग्रामपंचायतच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी काही भाग दिव्यांगाना वाटप करण्यात यावा. असा जीआर आहे. त्यानुसार वळदगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील 33 दिव्यांगांना धनादेशाद्वारे हा निधी वाटप करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सरपंच अमर कचरूसिंग डांगर, उपसरपंच संजय त्रिंबकराव झळके, ग्रामविकास अधिकारी बळीराम धर्मु राठोड, ग्रामपंचायत सदस्य गणेश कडूबा नवले, विष्णू रंगनाथ झळके, अशोक रमेश खोतकर, मनेश मधुकर शिंदे तसेच रितेश चुन्नीलाल पहाडिये, राजु हरीभाऊ मुसळे, चांदपाशा इस्माईल शेख, शेख शफीक चांद, नितेश विजय चुंगडे, राधा मरमट, दिव्यांग लाभार्थी सारंगधर गुंड, सुनील गुंड, किरण कोठळकर, चंद्रकांत मुसळे, संगीता भवर, आकाश रोकडे, शुभांगी रोकडे, अन्ना साबळे, यश नानासाहेब जोगदंड, शोभा साबळे, संध्या गंगातीरे, मंदा रोकडे, अर्चना कायटे, पुजा औताडे व गावकरी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *