February 5, 2026


वाळूज महानगर, (ता.3) – मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन तेथील विविध विकास कामांचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण व भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी अंदाजे दीड कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी जोगेश्वरी येथील हनुमान मंदिर, अंगणवाडी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी 10 लक्ष, आंबेडकर नगर येथील मेन रोड ते जयभावानी हॉटेल पर्यंत रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी 10 लक्ष, तुर्काबाद येथील मारोती मंदिर ते वेश पर्यंत सी.सी.रोड करण्यासाठी 5 लक्ष, दलित वस्ती अंतर्गत सी.सी.रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, डोमेगाव येथे सी.सी.रोड करण्यासाठी 10 लक्ष असा 45 लाखाचा निधी दिला. ही विकास कामे पूर्ण झाली असून या विकास कामांचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (ता.2) करण्यात आले. तसेच जोगेश्वरी येथील शंकरफाटा ते कमळापूर रोड पर्यत सी.सी.रोड करण्यासाठी 10 लक्ष, ईदगाह परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, डॉ.आंबेडकर कमान ते आंबेडकर स्मारकापर्यंत सी.सी.रोड करण्यासाठी 10 लक्ष, जोगाईमाता मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी 5 लक्ष, वॉर्ड क्र. 3 मध्ये ड्रेनेज लाईन करण्यासाठी 10 लक्ष, विटावा येथे गावअंतर्गत सी.सी.रोडसाठी 10 लक्ष, रामराई येथे गावअंतर्गत सी.सी.रोड करण्यासाठी 5 लक्ष, तुर्काबाद येथे गावअंतर्गत सी.सी.रोडसाठी 10 लक्ष, ईदगाह परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 5 लक्ष, डोमेगाव येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी 10 लक्ष, राजुरा गावअंतर्गत सी.सी.रोड करण्यासाठी 10 लक्ष, कमळापूर येथे गावअंतर्गत सी.सी.रोडसाठी 10 लक्ष रुपये. असा एकूण 1 कोटी 9 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी मी जोगेश्वरीमध्ये आलो होतो. येथील रस्ते, पाणी, ड्रेनेज आदींच्या समस्या पाहून वाईट वाटले. येथील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यामुळे याठिकाणी मी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील नगरे, गंगापूरचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, युवकचे तालुकाध्यक्ष राजू पठाण, वैशालीताई पवार, जोगेश्वरीचे सरपंच रमेश आरगडे, उपसरपंच नजीर पठाण, सूर्यभान काजळे, माजी सरपंच प्रवीण दुबिले, संदीप अल्हाड, प्रकाश साबळे, भिकन घोडके,.भास्कर दुबिले, मोहसीन शेख, रमेश निश्चित, मारोती साळवे, पप्पू अल्हाड,.ज्ञानेश्वर मातकर,.भारत गरड, विलास सौदागर, शंकर प्रधान, कृष्णा बोबडे, प्रभू काजळे, सुरेश वाघमारे, मुंजाराम दाभाडे, बाळू गोरे, एम.आर.पठाण, मधुकर उगले, शंकर प्रधान, आदींची उपस्थिती होती. यावेळी अंबेलोहळ येथील पंचायत समिती सदस्य पुंजाराम दाभाडे, जोगेश्वरी येथील कल्याण दुबिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला…

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *