March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.30) – मासिआ ‘महिला उद्योजकता विकास सेल’च्या माध्यमातून उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या आणि उद्योगांमध्ये सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी मसिआने उद्योग व्यवसायासाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शनपर शिबिर, यशस्वी महिला उद्योजकांचे रेयर शेयर, अभ्यास दौरे आदी माहितीपर कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ‘महिला उद्योजकता विकास सेल’ च्या माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी मेटलमॅन आटो प्रा. लि. वाळूज येथे महिला उद्योजकांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी मेटलमॅन आटोचे श्रीकांत मुंदडा यांनी मसिआच्या अभ्यास दौऱ्यातील सहभागी महिला उद्योजकांचे स्वागत करून मेटलमॅन आटो प्रा. लि. या कंपनीतील कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. यावेळी अभ्यास दौऱ्यातील सहभागी उद्योजक महिलांना आणि ऑटोमेशन सिस्टम एक्सलन्स बद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी कंपनीची ग्रोथ करताना काय काय अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली. याचा अनुभव सांगितला. या अभ्यास दौऱ्यातील सहभागी महिला उद्योजकांनी हा दौरा अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपर आणि प्रेरणादायी झाल्याचे मत व्यक्त केले.

अभ्यास दौऱ्यासाठी वेळ आणि परवानगी दिल्याबद्दल उद्योजक महिलांतर्फे यावेळी मेटलमॅन आटो प्रा. लि.चे व श्रीकांत मुंदडा यांचे आभार व्यक्त केले. या दौऱ्यासाठी ‘महिला उद्योजकात विकास सेलच्या’ संयोजिका सुनीता राठी यांच्यासोबत भेटीच्या प्रोजेक्ट लीडर सुलभा थोरात आणि सारिका किर्दक यांनी नियोजन केले. तर सीमा मालाणी, दीपिका भंडारी, माधुरी कदम आणि माधुरी कांबळे यांनी सहाय्य केले. यावेळी विंगच्या कल्पना काळे, आरती पारगांवकर, रत्नप्रभा शिंदे, मंगला महाजन, जमुना मानधनी, रेखा शिंदे, शितर काबरा उपस्थित होत्या. यावेळी कंपनीसोबत कॉर्डिनेट करण्याचे साह्य जयश्री जोशी यांनी केले.
फोटो ओळ – मसिआच्या ‘महिला उद्योजकता विकास सेल’ च्या अभ्यास दौर्यात मार्गदर्शन करताना मेटलमॅन आटोचे श्रीकांत मुंदडा.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *