
वाळूज महानगर, (ता.18) – रांजणगाव (शेणपुंजी) श्री गजानन विद्या मंदिर आणि बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल या शाळेत दैनिक सकाळच्या वतीने इको गणपती कार्यशाळा सोमवारी (ता.18) रोजी घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडूच्या माती पासून आकर्षक व मनमोहक गणेश मूर्ती बनवल्या. विशेष म्हणजे या गणेश मूर्ती विद्यार्थी स्वतः घरी स्थापन करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. 
दैनिक सकाळच्या वतीने नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन करते याचाच एक भाग म्हणून गणपती उत्सवाचे निमित्त साधून रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरण पूरक इको गणपती कार्यशाळा घेण्यात आली. शासकीय कला महाविद्यालयातील प्रशिक्षक
प्रा. योगेश औताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
या कार्यशाळेत असंख्य विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्ष आय.जी.जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर, हनुमंत जाधव,शहाजी मंगनाळे, मनीषा नवथर ,संजय तुपे , कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, संदीप हिंगणकर, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, स्वाती सूर्यवंशी, गणेश शिरसाठ, निलेश पाटील, दीपक कोळी, दीपक पठारे, गोरवाडकर, सुभाष जाधव, पूजा गिरी, जब्बार पठाण, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.

आय जी जाधव – या कार्यशाळेच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव यांनी सध्याच्या काळात निसर्गाचे संतुलन टिकवण्याची काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. याच संकल्पनेतून आणि दैनिक सकाळच्या पुढाकाराने शाळेमध्ये शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती विद्यार्थ्यांच्या हस्ते बनवून विद्यार्थी मूर्तिकार बनले. विद्यार्थी व शिक्षक यांनी सोबत या कार्यशाळेचा आनंद लुटला.
