March 26, 2026

वाळूज महानगर, (ता.27) – वाळूज, चिकलठाणा व शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे लवकरात लवकर निवारण करा अशी मागणी मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी मसिआ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यामध्ये 26 जुलै रोजी मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत एमआयडीसीकडे मागणी केली.

यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, प्रशासकीय अधिकारी चेतन गिरासे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, ए एस कठाळे, नितीन असलकर तसेच मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. या बैठकीत अनिल पाटील यांनी वाळुज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक क्षेत्रामधील पावसाचे पाणी कंपन्यामध्ये घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक त्या ठिकाणी गती अवरोधक बसवणे, नाले सफाई, रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या अवैध टपरी धारकांना हटवणे, औद्योगिक क्षेत्रात योग्य दाबाने आणि सुरळीत पाणी पुरवठा करणे, औद्योगिक क्षेत्रातील कचरा नियमितपणे उचलणे, औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यास पर्यायी रस्ता तयार करणे,एन आर बी चौकात भरत असलेला फळभाजी बाजार हटविणे, कामगार व कर्मचारी यांचेसाठी औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे तसेच बजाजनगर मध्ये कामगारांसाठी मनोरंजनासाठी प्रयत्न करणे. आदी समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्यावर त्वरित उपाययोजना करून त्या अंमलात आणाव्यात. अशी विनंती यावेळी मसिआच्या वतीने करण्यात आली. त्यावर यावेळी राजेंद्र गावंडे व चेतन गिरासे यांनी या समस्यांचे लवकरात लवकर निरसन आश्वासन दिले. या बैठकीसाठी मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, चेतन राऊत, सचिव कमलाकर पाटील, राजेंद्र चौधरी, सहसचिव सर्जेराव साळुंके, कोषाध्यक्ष सुरेश खिल्लारे, राजेश मानधनी, कार्यकारिणी सदस्य अभिषेक मोदाणी, प्रल्हाद गायकवाड, मंगेश निटुरकर, प्रसिद्धीप्रमुख अब्दुल शेख, सहप्रसिद्धी प्रमुख श्रीराम शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *