March 24, 2026


वाळूज महानगर, (ता 21) – महाराष्ट्र भूषण डॉ. व्यंकट मैलापुरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने छत्रपती संभाजीराजे वृक्ष बँक उपशाखा नंबर-1 ची स्थापना बजाजनगर येथे शनिवारी (ता.22) जुलै 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता करण्यात येणार आहे.

डॉ. व्यंकट मैलापुरे यांच्या सौजन्याने स्थापन करण्यात येणार्या या छत्रपती संभाजीराजे वृक्ष बँकेच्या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण पूरक देशी झाडांची लागवड व्यंकट मैलापुरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रामलीला मैदान बजाजनगर, हायटेक कॉलेज जवळ शनिवारी (ता.22) जुलै 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजन नियोजक रामलीला मैदान सामाजिक सेवाभावी संस्था व छत्रपती संभाजीराजे वृक्ष बँक परिवार, तसेच समस्त बजाजनगर वृक्षप्रेमी परिवार यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *