March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता 21) – पंढरपूरकडून वाळूजकडे जाणारी दुचाकी व पाठीमागून येणारा आयशर ट्रक यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास वाळूज जवळ झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गंगापूर येथील शिवाजी बापूराव ठुबे वय 39, हा दुचाकीस्वार पंढरपूर येथून वाळुज मार्गे गंगापूरच्या दिशेने जात होता. त्याच्या पाठोपाठ आयशर ट्रक (एम एच 14, जी डी – 0107) येत होता. ही दोन्ही वाहने एका मागे एक येत असताना वाळूज जवळ त्यांच्यात अपघात झाला. शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी आयशर ट्रक खाली अडकल्या गेली.

तसेच एका प्रत्यक्ष दर्शनी सांगितले की, आयशर ट्रक अंगावरून गेल्याने शिवाजी ठुबे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती कळताच अन्य वाहनधारकांनी पोलिसांच्या मदतीने जखमी शिवाजी ठुबे यास उपचारार्थ घाटीत दाखल केले.

वाळूज पोलिसांनी अपघातग्रस्त आयशर ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *