March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.19) – सध्या होत असलेल्या सायबर गुन्ह्यावर महिलांनी सजग रहावे, फसवणुकीला बळी न पडता याबाबत साक्षर होण्याची सध्या गरज असल्याचे मत व्यक्त करत मसिआच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी होत असलेल्या भरीव कार्याचे कौतुक पोलीस उपायुक्त मोक्षदा पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी उद्योजक महिलांशी दिलखुलास संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 


मसिआच्या महिला उद्योजकता विकास सेल अंतर्गत मंगळवारी (ता.18) रोजी वाळूज येथील ‘अनिल विश्वासराव चव्हाण’ सभागृहात ‘ 2023-24’ चा पदग्रहण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त मोक्षदा पाटील या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमास मे. ग्राइंड मास्टर मशीन्स प्रा. लि.च्या संचालिका मोहिनी केळकर यांच्यासह मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, महिला उद्योजकता विकास सेलच्या रत्नप्रभा शिंदे, उद्योजक सलिल पेंडसे आदींची उपस्थिती होती.

यावेळी सलिल पेंडसे यांनी महिला सेलचा आजपर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगितला. रत्नप्रभा शिंदे यांनी महिला उद्योजकता विकास सेल 2022-23 अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचा आढावा सादर केला. यानंतर अध्यक्ष अनिल पाटील यांनी या सेलच्या 2023-24 साठी सुनीता राठी यांनी नियुक्ती केल्याचे जाहीर करून रत्नप्रभा शिंदे यांनी सुनीता राठी यांना कनव्हेनर पदाची धुरा सोपवली. यावेळी 2022-23 च्या महिला सेलच्या सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षी देखील महिला उद्योजकांसाठी विविध सेमिनार, औद्योगिक अभ्यास दौरे, रेयर शेयर आदीचा मानस बोलून दाखवला. यावेळी उद्योजिका मोहिनी केळकर यांनी यावेळी मसिआच्या महिला उद्योजकता विकास सेलच्या माध्यमातूनच नवीन उद्योजिका होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणी, महिला यांना प्रोत्साहनच मिळते असे मत व्यक्त केले. प्रत्येकात काही तरी चांगले करण्याची क्षमता असते. महिलांनी आपली क्षमता ओळखावी आणि त्यानुसार कार्य करावे. असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, चेतन राऊत, सचिव कमलाकर पाटील, राजेंद्र चौधरी, सहसचिव सर्जेराव साळुंके, सचिन गायके, कोषाध्यक्ष सुरेश खिल्लारे, राजेश मानधनी, प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, सहप्रसिद्धीप्रमुख श्रीराम शिंदे, उद्योग संवादचे संपादक मनीष अग्रवाल यांच्यासह कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, प्रल्हाद गायकवाड, दुष्यंत आठवले, सलिल पेंडसे, राजेश हुंडेकर, मंगेश निटुरकर, माजी अध्यक्ष अशोक काळे, उद्योजक श्याम राठी, अशोक थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी एकूण 150 उद्योजक आणि महिला उद्योजकांचा सहभाग होता. सुनीता राठी, रत्नप्रभा शिंदे, आरती पारगावकर, कल्पना काळे, सुलभा थोरात, राजश्री कुलकर्णी, पल्लवी दलाल, जया पवार, सारिका किर्दक, वर्षा लोया, मंगला महाजन, प्रियंका वाबळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कुलकर्णी आणि पल्लवी दलाल यांनी तर आभार आरती पारगावकर यांनी मानले.

महिलांना उद्योग, व्यवसायासाठी स्थापना
छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगीक क्षेत्रात सध्या नविन उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. महिलांना औद्योगिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी नविन उद्योगांची सुरुवात करावी, आहे त्या उद्योगांचे संचलन समर्थपणे करावे, त्यांना नवनवीन संधी शोधता याव्या तसेच प्रशासकीय पातळीवर उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आत्मविशास वाढावा यासाठी महिला उद्योजकता विकास सेल द्वारे प्रयत्न केले जात आहेत. या सेलच्या माध्यमातून उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या आणि उद्योगांमध्ये सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी मसिआने उद्योग व्यवसायासाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शनपर शिबिर, यशस्वी महिला उद्योजकांचे रेयर शेयर आदि माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *