March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – लग्नामुळे कर्ज झाले आहे. तु माहेरून दिड लाख रुपये घेवुन ये. असे म्हणून 27 वर्षीय विवाहितेस शिवीगाळ व मारहाण करुन तसेच उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरे अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पोलीस कॉलनी, वाळुज ता. गंगापूर येथील प्रिती या 27 वर्षीय तरुणीचे पिंपरखेडा ता. गंगापूर येथील सचिन विजयराव मुळे वय 32 यांच्या सोबत हिंदु धार्मीक रितीरिवाजाप्रमाणे दिनांक 14/05/2022 रोजी लग्न झाले आहे. लग्नात प्रितीच्या आईने संसार उपयोगी सामान दिलेले होते. लग्नानंतर तिला सासरच्यांनी तीन महीने चांगले नांदवले. त्यानंतर तिचा पती सचीन मुळे वय 32 वर्षे, सासरे विजय विश्वनाथ मुळे वय 65 वर्ष, सासु सुनिता विजय मुळे वय 60 सर्व रा. पिंपरखेडा ता. गंगापूर हे तिला घरातील शुल्ल्क कारणावरुन शिवीगाळ करुन त्रास देवु लागले. तिच्या पतीच्या सांगण्यावरुन सासु-सासरे हे तिला आणखीच त्रास देत असे व पती हे लग्न झाल्यापासुन एकही दिवस तिच्या सोबत प्रमाने राहीला नाही. तो नेहमीच तिला मानसिक व शारिरीक त्रास देत. लग्नामुळे कर्ज झाले आहे. तु माहेरून दिड लाख रुपये घेवुन ये असे बोलून तिला त्रास देत असे. व शिवीगाळ करुन मारहाण करुन उपाशी ठेवत असे. हे तिने आईस सांगितल्यानंतर आईने त्यांना 50 हजार रुपये दिले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये पती पुण्यामध्ये ड्युटी साठी गेला तेंव्हा, तुला मी 2 ते 3 महिण्यानंतर घेवुन जातो. असे म्हणाला. पतीस बोलण्यासाठी वेळोवेळी फोन लावल्यानंतर तो तिच्या सोबत न बोलता काही कारणे सांगुन फोन कट करुन देत असे. कालांतराने सासु-सासरे यांनी पुन्हा 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यावर ती त्यांना म्हणाली की, माझे आईची परिस्थिती जेमतेम आहे, ते पैसे देवु शकत नाही. त्यावरून सासु व सासरे यांनी शिवीगाळ करुन मारहाण करुन दिनांक 14/03/2023 रोजी रात्री तिला घरा बाहेर लोटुन काढुन दिले व दरवाजा बंद करुन घेतला. त्यामुळे तिने रात्री भावास फोन करुन बोलावुन घेतले व आईकडे घरी आली. पतीने हुंडा म्हणुन 50 हजार रुपये घेवुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला वेळोवेळी मारहाण केली. सासु व सासरे यांनी जिवे मारण्याच्या धमक्या देवुन शारिरीक व मानसिक छळ करुन घरातुन हाकलुन दिले. या प्रकरणी प्रिती सचिन मुळे वय 27 वर्ष, रा. ह. मु.पोलीस कॉलनी, वाळुज ता. गंगापूर हिच्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *