May 9, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – एका भामट्याने दोन साथीदारांच्या मदतीने विश्वासाने ट्रक खरेदी करून विकत घेतो. असे सांगून लेखी करार करून ठरल्याप्रमाणे रक्कम दिली नाही व ट्रकची देखील बेकायदेशीर रित्या परस्पर विल्लेवाट लावली. तसेच कर्जाचे ठरलेले हप्ते देखील न भरता तिघांनी संगनमत करुन अंदाजे सोळा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका त्रिकुटाविरुद्ध मंगळवारी (ता.11) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोलेगाव ता. गंगापूर येथील कैलास लक्ष्मण पवार हे शेती व व्यापार करतात. त्याच्या माकलीची टाटा कंपनीची 12 टायर ट्रक (एम एच 12, एम व्ही-3572) ही मुस्ताक मुनीर शेख बाबु व विशाल भास्कर पावशे रा. रांजणगांव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर या दोघाच्या मध्यस्थीने 17 लाख 25 हजार रूपयांमध्ये शेख रिजवान शेख सिकंदर रा .गल्ली नं.8, न्यू बायजीपूरा, इंदिरानगर, छत्रपती सभाजीनगर यास विकी करण्याचा करार रांजणगाव (शे.पु.) येथील एका हॉटेल मध्ये 30 जानेवारी 2023 रोजी केली होता. व त्याचा रितसर करारनामा नोटरी अँड. राजेंद्र डी. तिडके याच्या समक्ष बजाजनगर वाळूज येथे त्याच रोजी केला होता. या करानाम्यानुसार 1 लाख 30 हजार रूपये इसार म्हणून नगद स्वरूपात दिले होते. व उर्वरित रक्कम 2 लाख 45 हजार 27 फेब्रुवारी 2023 रोजी देण्याचे ठरले होते. व राहीलेली स्वकम 13 लाख 50 हजार गाडीवर असलेले एम. व्ही. स्मॉल फायनान्सचे लोन हप्ता रक्कम रूपये 40 हजार प्रमाणे लोन हप्ते भरण्याचे ठरले होते. व ट्रक शेख रिजवान शेख सिकंदर याच्या ताब्यात दिली होती. परंतु रिजवान याने 27 फेब्रुवारी रोजी राहीलेली रक्कम 2 लाख 45 हजार रुपये ही देण्याचे ठरले असल्याकारणाने त्याने ती रक्कम दिली नाही. म्हणून कैलास पवारने त्यास फोन केला असता, त्याचा फोन बंद असल्याने सांगण्यात आले. म्हणून त्याच्या घरी गेला असता त्याच्या पत्नीने सांगीतले की, ते घरी नाही, बाहेरगावी गेलेले आहे. त्यानंतर माहीती मिळाली की, सिकंदर याने जालना येथील सलीम गुलजार शेख याची देखील ट्रक खरेदी करून तीचे हप्ते भरले नाही व गाडी परसपर विक्री केली आहे. शिवाय त्याला पैशे देखील दिले नाही. म्हणून त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशन चंदनजिरा येथे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी व्यक्ति हा अशा प्रकारेच लोकाना फसवतो. अशी खात्री होताच कैलास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुस्ताक मूनीर शेख, विशाल भास्कर पावशे, शेख रिजवान शेख सिकन्दर या तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका त्रिकुटाविरुद्ध मंगळवारी (ता.11) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करीत आहे.
तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ –
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कैलास पवार यांनी 5 मार्च 2023 रोजी पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. वाळूज येथे तकार देण्यास गेले असता पोलिसांनी तकार नोंदवून घेतली नाही. म्हणून या प्रकरणाची तकार पोलिस आयुक्त औरंगाबाद याना रजि. पोस्टाने त्याच रोजी पाठवली व त्याची एक प्रत पोलिस सहआयुक्त व पोलिस निरिक्षक एम आय डी सी वाळूज यांना दिली. परंतु पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *