
वाळूजमहानगर, (ता.12) – बजाजनगर येथील भुमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पोपटराव आदिक यांचा 60 वा वाढदिवस संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सोमवारी (ता.10) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम सकाळी दहा वाजता गोशाळा बजाजनगर येथे काकासाहेब चेळेकर यांच्या तर्फे 2 हजार 500 किलो हिरवा चारा दान देण्यात आला. सावली अनाथ आश्रम सिडको, बजाजनगर येथील मुलांना रामदास पैठण पगारे यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर आर आर बाहेती संस्थेतील अंध मुलांना आश्विन आदिक व सुमित चोरडिया यांच्या तर्फे अल्पोपहार वाटप, भगवान बाबा आश्रम येथील मुलामुलींना जेवण देण्यात आले. दुपारी 1 वाजता हे जेवण आर्जुनराव आदमाने पाटील व कैलास भोकरे यांच्या कडून देण्यात आले.
मातोश्री आश्रम पैठण रोड येथील 150 वृद्ध महिला पुरुषांना अल्प आहार देण्यात आला. हा अल्पआहार भगवान ढेरेंगे पाटील यांच्यातर्फे देण्यात आला. तसेच 2009 ते 2023 या कालावधी भुमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष पोपटराव आदिक पाटील यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना गजानन विद्यालय यांच्या तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सर्व मंडळीसह हनुमान भोंडवे, वडगाव (को.)- बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, दशरथ मुळे, अंबादास मोरे होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीसरामील मान्यवर व्यक्तीचा सहभाग होता. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अनीलभैया चोरडिया, गरुड झेपचे संचालक निलेश सोनवणे व शिवसनेचे उपजिल्हा प्रमुख सुरेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते पारसचंद साकला, उपतालुका प्रमुख विष्णू जाधव पाटील व माजी उपसरपंच उषाताई हांडे, विजय जाधव, संजय महिंद्रकर, कैलास सोनवणे पाटील आदी वरिष्टांचा समावेश होता. शेवटी आभार प्रदर्शन भाऊसाहेब डमाळे व रमेश शेळके यांनी आभार मानले.
