August 9, 2026

वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधिल सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांचा गण, गट, निहाय पद नियुक्तीचा कार्यक्रम सिद्धिविनायक गणपती मंदिर, त्रिमुर्ती चौक, बजाजनगर येथे पद वाटप करण्यात येणार आहे.

सोमवारी (ता.10) रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांच्या आदेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधील शिवसेना-युवासेना महिला आघाडी, भारतीय कामगार सेना, शिक्षक सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगिकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे अवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख बप्पाजी दळवी, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख तथा ग्रा.पं सदस्य सागर शिंदे पाटील यांनी केले आहे.
———————

About Author

1 thought on “शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बजाजनगरात नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *