March 23, 2026

वाळूजमहानगर ता.21 (बातमीदार) – उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून मारहाण केल्याने पोलिसात दिलेली तक्रार परत घे. असे म्हणून तीन जणांनी कार अडवून एकाला बेदम मारहाण केली. वाळूज परिसरातील ही घटना सोमवारी (ता.20) रोजी रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
शेख नदीम शेख महेबुब, वय- 35 वर्ष, धंदा- इलेक्ट्रीशन, रा. सैलानी बाबानगर, रांजणगाव (शेणपुंजी) ता. गंगापूर जिल्हा संभाजीनगर हा सोमवारी (ता.20) रोजी रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घरी असताना, चाँदभाई यांनी त्याला फोन करून मदीना मस्जिद, ज्ञानेश्वरनगर, रांजणगाव येथे बोलावून घेतले. तो मदिना मस्जिद जवळ आल्यानंतर चाँदभाई म्हणला की, मी तुला दिलेले दोन हजार रुपये मला परत दे, तेव्हा नदीम याने त्यास सांगितले की, मी तुझे लाईट फिटिंगचे काम केले व बाकी पैसे तुझा मुलगा आजाद शेख याचेकडे दिले आहे. तेव्हा चाँद शेख हा म्हणाला की, मला माहीती नाही, मी तुला दिलेले दोन हजार रुपये मला परत पाहीजे? असे म्हणून शिवीगाळ करून हाताचापटांनी मारहाण केली. त्यामुळे नदीमने पोलीस ठाण्यात येवुन चाँद शेख याचे विरुध्द तक्रार दाखल करून घरी जात असताना, दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास भगतसिंग शाळेच्या मागे रांजणगाव (शेणपुंजी) येथे चाँद शेख, आझर शेख, विकी उर्फ कलर यांनी नदीमची गाडी अडवून गाडीचा दरवाजा उघडून गाडी मध्येच तोंडावर बुक्या मारून बाहेर ओढले. त्यानंतर लाथाबुक्याने मारहाण केली व पोलीसात केलेली केस मागे घे. असे म्हणून हातातील प्लास्टीकच्या पाईपने बरगडीत, उजव्या खांद्यावर मारहाण करून जखमी केले व तेथून पळून गेले. प्रकरणी शेख नदीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी चाँद शेख, आझर शेख व विकी उर्फ कलर सर्व रा. सैलानी बाबानगर, रांजणगाव (शेणपुंजी) यांच्या विरुद्ध कलम 341, 324, 323, 504, 34 भादवि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाडेकर करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *