
वाळूज महानगर (ता.15) :- अकरावीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी राहत्या घरातून अपहरण केले. पालकांसाठी अत्यंत खळबळ जनक असलेली ही घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे सोमवारी (ता.13) रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर या कामगार वसाहतीतील पती-पत्नी कंपनीत गेले असता लहान भावा बरोबर घरी असलेली अकरावीच्या वर्गात शिकणारी 17 वर्षीय मुलगी सोमवारी (ता.13) रोजी घरी असताना तिचे अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.14) रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय राठोड करीत आहे.
