
वाळूजमहानगर, (ता.1) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मंगळवारी (ता.28) रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ज्ञानेश्वर झाडे, म्हतारदेव गव्हाणे उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील आधुनिक उपकरणे, पाणी पातळी मापक यंत्र, नैसर्गिक शेती, सौर ऊर्जा, आयुर्वेदिक वनस्पती शेतकरी पीक संरक्षण यंत्र, व्यसनाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, शेतकरी जीव संरक्षण, हवेपासून पाणी निर्मिती, स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्र, अंतराळ यान, गणितातील नवीन सूत्रे, विविध क्लृप्त्या,भागाकार वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोणमिती, पझल बोर्ड, वेदिक गणित, पायथागोरस कार्यप्रणाली, वयगणक यंत्र यांसारख्या अन्य विषयांवर प्रयोगांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, प्राचार्य रवी दाभाडे, समन्वयक राणी सावंत, गहेना शादिजा, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करताना मान्यवर.
