
वाळूजमहानगर (ता. 10) :- आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्याला स्वतः चे अस्तित्व टिकवायचे असेल तर प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेला सामोरे जावेच लागेल. असे मार्गदर्शनपर आवाहन प्रसिध्द संमोहनतज्ञ एस. के. नांदेडकर (लाईफ कोच) यांनी शुक्रवारी (ता.10) रोजी केले.

“श्री गजानन ज्युनिअर कॉलेज रांजणगाव (शे.पु.) सायन्स, कॉमर्स, आर्टस” कॉलेजच्या विद्यामानाने 10 वी नंतर काय? या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, प्राचार्य महेश शिनगारे, श्री गजानन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बास्वदे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल – माध्यमिकचे मुख्यध्यापक एस. के. शिरसाठ व शिक्षक, पालक मोठ्या संख्खेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा देशपांडे यांनी केले. तर आभार प्रा. संजय तुपे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नीलिमा रेळेकर, पूजा गिरी, बिदरकर मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
