
वाळूजमहानगर, (ता.31) – वाळूज येथील आयसीम इंजिनियरिंग व एमबीए महाविद्यालयात इंडीयन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट (आयआयएमएम) आणि आयसीम कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत या कोर्सेसच्या माहिती केंद्राचा उद्घाटन सोहळा झाला.

आयसीम कॉलेजमध्ये झालेल्या या उद्घाटनासाठी इंडूरन्स ग्रुपचे उपाध्यक्ष संजय संघई, आयआयएमएम (औरंगाबाद)चे अध्यक्ष के. श्रीहरी, डॉ. नरेंद्र जोशी, श्रीकांत शेळके, श्रीकांत मुळे, पारस मुथा, एम फनी कुमार, दत्ता बैनाडे, आयसीमचे अध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, सचिव दिलीप सारडा, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, कँपस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, संचालक आर. एस. जहागीरदार, डॉ. गौतम शहा, उपप्राचार्य हेमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभ्यासक्रमाला पदवीधारक, पदविकाधारक, बारावी उत्तीर्ण आणि कंपनीत स्टोअर, पर्चेस, लॉजिस्टिक, वेअर हाऊस या क्षेत्रातील एक ते दोन वर्षाचा अनुभव असणारा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम तीन आणि सहा महिन्याचा आहे. या उमेदवारांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा कोर्स केलेल्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशी माहीती इंडूरन्स ग्रुपचे उपाध्यक्ष संजय संघई यांनी दिली. यावेळी प्रा. आनंद हुंबे, प्रा. दिपमाला बिरादार, प्रा. मंगल काळे, प्रा. विनोद शिखरे, डाॅ. समीर जोशी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
