
वाळूजमहानगर, (ता.21) – शहीद भगतसिंग हायस्कूल बजाजनगर येथे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व पोलीस उपनिरीक्षक स्वाती राऊत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मौलिक समुपदेशपर मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर उपस्थित होते.
शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे व शहीद भगतसिंह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक स्वाती राऊत विद्यार्थ्यांना समुपदेशपर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या वाईट अनुभव लपवून न ठेवता प्रथम आई-वडिलांना शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक यांना सांगाव्या. तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क करून कळविण्यात यावा. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रकृतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. आपली स्वप्न व ध्येय मोठी ठेवावीत. या ध्येयाच्या दिशेने आपण पाठलाग करावा. यावेळी गुरमे यांनी व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले. व्यायाम व ज्ञान या दोन्ही बाबी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्ञान घेऊन आपल्या आई-वडिलांची ओळख समाजात निर्माण करावी, योग्य आहार विहाराकडे लक्ष द्यावे. वय वर्ष अठरा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची वाहने चालूवू नये. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर यांनी पोलीस अधिकारी व शिक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे व आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम प्रसंगी वर्षा जाधव, महादेव लाखे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, भरत बोडखे, शहाजी भुकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, हरिश्चंद्र गवळी, गोपाल आधाने, आतिश डोईफोडे, आशिष मात्रे, अंबिका साळवे, प्रकाश वाघ, राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आर. बी. चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

