
वाळूजमहानगर, (ता.21) – रस्त्याने पायी जाणाऱ्या सिडको वाळूज महानगर येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या गुडईअर टायर कंपनीचा कामगार असलेल्या एका चोरट्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडून जेरबंद केले. विशेष म्हणजे त्याच्या ताब्यातून 1 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्वामी समर्थनगर प्लॉट नंबर 23, सिडको महानगर – 1 येथील रुपाली शिवाजी जाधव व कौशल मच्छिद्र पवार या दोघी 12 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पायीपायी जात होत्या. त्यांच्या समोरुन रॉगसाईडने अंदाजे 25 ते 28 वर्ष वयाचा एक व्यक्ती सिल्वर रंगाच्या होन्डा शाईन दुचाकीवर आला. आणि त्याने रूपाली यांच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीचे दोन पळ्या, पाईप मनी, मशीन मनी व काळे मनी असलेले मनीमंगळसुत्र 12 ग्रॅम वजनाचे ओढुन पळुन गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपास सुरू झाला. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाचे पोउपनि चेतन ओगले व विशेष तपास पथकाचे अंमलदारांनी घटनास्थळाचा परिसर पिंजून काढून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून अज्ञात आरोपीचा शोध घेतला. फोटो वरून तो गुडईअर टायरच्या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळाली. मात्र तो तेथे मिळून आला नाही. त्या नंतर आरोपीस शनिवारी (ता.21) रोजी औरंगाबाद शहरातून ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्याने त्याचे नाव संतोष प्रकाश भिसे वय 27 वर्ष रा. वरुडी पो. गेवराई बाजार ता. बदनापुर जि. जालना ह.मु. हनुमाननगर कमळापुर ता. गंगापुर असे असल्याचे सांगीतले. त्याने सिडको महानगर -1 परिसरात रूपाली जाधव या महिलेचे मंगळसुत्र दुचाकी (एम एच 20, बी एक्स-1083) या दुचाकीवरून चोरी केल्याचे सांगीतले. त्या नंतर आरोपी कडून गुन्हयातील मुदेमाल फिर्यादी यांचे मंगळसुत्र व दुचाकी असा एकुण 1 लाख 55 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपआयुक्त दिपक गिर्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. नि.संदीप गुरमे, पोउपनि चेतन ओगले, पो. अं. राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके, बाबासाहेब काकडे, सुरेश कचे यांनी केली.
