वाळूजमहानगर, (ता.19) – भरधाव येणारी एसयुव्ही कार आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक झाल्याने दुचाकी वरील दोन जण जखमी झाले. जखमीतील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमींना नानिजधामच्या रुग्णवाहिकेने उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी (ता.19) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील जिकठाण फाट्यावर झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, एसयुव्ही (जी जे 18, बी एस -3577) ही औरंगाबाद – नगर हायवेने गंगापूरकडून वाळूजकडे येत होती. तर दुचाकी (एम एच 20, जी एफ -3222) ही गंगापूरच्या दिशेने जात होती.
ही दोन्ही वाहने जिकठाण फाट्यावरील चौकात येतात त्यांच्यात जोराची धडक झाली. अपघातात दुचाकी वरील दोन जण जखमी झाले. गुरुवारी (ता.19) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या ॲम्बुलन्सने अपघातस्थळी धाव घेऊन पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या अक्षय जाधव या तरुणाच्या डाव्या पायाचा पंजा आणि घोट्याच्या वर पाय मोडला आहे. तसेच शशिकांत पुरी याला मुक्का मार लागला आहे. जखमी हे दहेगाव बंगला येथील असल्याचे कळते. मात्र एसयुव्ही कारमधील जखमींची माहीती मिळू शकली नाही.
