February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.19) – रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणुकीसाठी एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी योगिता प्रभाकर महालकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्याशी अधिकारी तथा वाळूज तलाठी सज्जाचे मंडळ अधिकारी संतोष इथापे यांनी गुरुवारी (ता.19) रोजी जाहीर केले.

वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील तत्कालीन सरपंच कांता जाधव यांनी राजीनामा दिल्याने रित्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी (ता.19) रोजी निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यशी अधिकारी म्हणून वाळूज तलाठी सज्जाचे मंडळ अधिकारी संतोष इथापे होते. ग्रामविकास अधिकारी एस एन रोहकले यांनी त्यांना सहकार्य केले.

ठरलेल्या वेळेत सरपंच पदासाठी योगिता प्रभाकर महालकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेत नंदिनी संतोष लोहकरे, पंकज गोरखनाथ हिवाळे, शिवराम हरिभाऊ ठोंबरे, कविता बाबुराव हिवाळे, सायराबानो जावेद सय्यद, साईनाथ बापूराव जाधव, कांता अशोक जाधव, अशोक गोरखनाथ जाधव, संजीवनी दीपक सदावर्ते, योगिता प्रभाकर महालकर, मोहनीराज मुरलीधर धनवटे, नंदाबाई हरेराम बडे, निर्मला बबन पठाडे, भीमराव फकीरराव कीर्तीशाही यांनी भाग घेतला.

सरपंचपदी योगिता प्रभाकर महालकर यांची निवड जाहीर होताच महालकर यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, प्रभाकर महालकर, गोरखनाथ पवार, शरद कीर्तीकर, गोरख बत्तीसे, गोरखनाथ शेळके, रज्जाक पठाण, समाधान बडे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *