वाळूजमहानगर, (ता.17) – दिवसेंदिवस वाढणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृती करून वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत हा उपक्रम वाळूज येथील के टी संगम इन्फ्रास्ट्रक्टर कंपनी लिमिटेड लिंबेजळगाव टोल नाका यांच्या वतीने सोमवारी (ता.16) रोजी राबवण्यात आला.
या रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमास वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे, वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन, टोल नाका व्यवस्थापक संजय सिंग, कार्यकारी अभियंता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात वाहन सुरक्षिततेसंदर्भात स्टिकर्स वाहनांवर लावून जनजागृती करण्यात आली. “यावेळी रस्ते सुरक्षा संदर्भात अपघात कसे रोखता येतील, गती नियंत्रण, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे याबाबत डॉ. एम. डी. संकपाळ उर्फ बाबा हिन्दुस्थानी यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुंदडा हॉस्पिटलच्या वतीने डॉ. योगेश बादले यांनी मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी लिंबे जळगावचे सरपंच नवनाथ वैद्य, वाळूजचे उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य तौफिक पटेल, चेअरमन सुभाष जाधव, रुपचंद गाडेकर, मतीन शेख, उपसरपंच शेख हाशम यांच्यासह टोल प्लाजाचे कर्मचारी, वाहन चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
