February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.7) – वाळूज येथील मुसा कादरी नगर (खळवाडी) येथे भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन सरपंच सईदा नबी पठाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.6) रोजी करण्यात आले. यावेळी उपसरपंच योगेश आरगडे, वार्ड सदस्य इस्माईल खान पठाण, ग्राम विकास अधिकारी उत्तम भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील पठाण गल्ली येथे सांडपाणी वाहण्यासाठी नाली नसल्याने ड्रेनेजचे पाणी उघड्यावरच वाहत होते. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. इस्माईल खान पठाण यांच्या प्रयत्नाने पंधराव्या वित्त आयोगातून पाच लाख रुपये खर्च करून येथे भूमिगत गटारी योजना राबविण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, पोपट बनकर, अमजद खान पठाण, शेख नदीम झुंबरवाला यांच्यासह येथील रहिवाशी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *