वाळूजमहानगर, (ता.31) – सिडको वाळूज महानगर- 1 मधील प्लॉट क्रमांक 508 मध्ये राहणारे मनोजकुमार मधुकर कदम (45) यांनी शुक्रवारी (ता.30) रोजी दुपारी दोन वाजेच्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ.शहाजी तौर यांनी मनोजकुमार यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
