February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – भरधाव जाणारी खाजगी ट्रॅव्हलची बस समोरील वाहनास धडकून झालेल्या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने बस पलटी झाली नाही, नसता मोठी दुर्घटना झाली असती. हा अपघात शनिवारी (ता. 24) रोजी सकाळी वाळुज महामार्गावरील बजाज कंपनी जवळ झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, लोटस ट्रॅव्हल या खाजगी ट्रॅव्हलची बस (एम एच 14, बी ए -92 41) ही पुणे, नगर कडून प्रवासी घेऊन औरंगाबाद कडे येत होती. ती वाळूज पंढरपूर दरम्यान असलेल्या बजाज कंपनी जवळ येताच समोरील अज्ञात वाहनाला जोरात धडकली. शनिवारी (ता. 24) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने ही बस पलटी झाली नाही. त्यामुळे बस मधील प्रवासी बालंबाल बचावले.

एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार या बसमध्ये अंदाजे 40 ते 50 प्रवासी होते. त्यांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर सर्व प्रवाशांना आपतकालीन दरवाजातून खाली उतरून देण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस अपघात स्थळावरून हलवण्यात आली. असेही या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या अपघातानंतर वाळुज पंढरपुर दरम्यान अपघात झालेल्या बाजूची वाहतूक कोंडी झाली होती. त्यातून वाट काढताना वाहनधारकांच्या नाकीनवाले. परिणामी अनेकांना निश्चित केलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता आले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *