February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.13) – शेतकऱ्यांची होणारी हेळसांड, रस्त्याची झालेली दुरवस्था यास आमदार प्रशांत बंबच जबाबदार आहे. लागलेली तालुक्याला ही कीड आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण सगळे मिळून काढून टाकू. सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तयार राहणार. असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी दिले.

डोमेगाव ता. गंगापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा नाम फलकाचे उद्घाटन शनिवारी (ता.10) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर खडसून टीका करत शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, तालुका अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, सर्कल अध्यक्ष रामदास वाघमोडे, प्रसाद पाटील, शाखा अध्यक्ष गणेश वाघमोडे, नवनाथ गायकवाड, किरण सुसलादे, साहेबराव जर्हाड, गंगाधर सुसलादे, धनंजय देशमुख, भावराव देशमुख, सोमनाथ वाघमोडे, अमोल सुसलादे, दौलत सुसलादे, अमोल सोलनकर, आप्पा सोलनकर, बंटी वाघमोडे, सोपान सुसलादे, किरण गायकवाड, अविनाश गायकवाड, सचिन वैद्य, फारूक शेख, शिवनाथ सुखलादे, गोविंद सोलनकर, अशोक महारनोर, भगवान सुसलादे, गणेश सोलनकर, अजय भाटवडेकर आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *