
वाळूज महानगर – लग्न झालेले असताना सुद्धा ते लपवून एका 29 वर्षीय तरुणीला लग्नाचे आम्हीच दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. 25 एप्रिल 2023 ते 28 जुलै 2026 दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात झिरोने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी जनार्दन बुद्धाची खरात वय 35 वर्ष याने स्वतःचे लग्न झालेले असताना ते लपवून माजलगाव तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणीशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तीचा विश्वास संपादन करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्न करण्याबद्दल विचारले असता छोट्या मोठ्या कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण केली. जोगेश्वरी गट नंबर 9 येथे 25 एप्रिल 2023 ते 28 जुलै 2026 दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी आरोपी विरोधात 4 नोव्हेंबर 2026 रोजी कलम 115 (2), 352, 69 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा परभणी जिल्ह्यात दाखल झाला असून तो झिरोने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार करीत आहे.
