
वाळूज महानगर, (ता.12) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्ताने रविवारी 12 एप्रिल रोजी दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज येथे अठरा तास सलग वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाविद्यालयातील चाळीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. 
या उपक्रमात विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे शांत व अभ्यासपूरक वाचन करून हे अभियान यशस्वी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणे, एकाग्रता वाढ व वेळेचे व्यवस्थापन करणे असा आहे. या उपक्रमासाठी डॉ. भगवान डोके आणि डॉ. सिंधू हळदे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी अल्पोपहार चहापाणी उपलब्ध करून दिला. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य पहावयास मिळाले. तसेच भविष्यामध्ये वेळेचा उपयोग करून वाचन आणि चिंतन याला प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमास संस्थेचे सचिव विजय राऊत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल हजारे यांनी भेट दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश वैष्णव, पंडित शिंदे आणि अनिल तांबे यांनी परिश्रम घेतले.
