
वाळुज महानगर, (ता.16) – बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अंदाजे 45 वर्षीय एका अनोळखी इसमाला उपचारार्थ गुरुवारी 15 जानेवारी रोजी घाटीत दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या अनोळखी इसमाची अध्याप ओळख पटली नाही त्याचा मृत्यू घाती ठेवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष हा पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड बायपास यशवंतनगर प्लॉट नंबर 31 समोर कॅनरा बँक जवळ छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी 15 जानेवारी रोजी रात्री 10:40 वाजेच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास घाटी दवाखाना येथे दाखल केले असता डॉक्टरांनी शुक्रवारी 16 जानेवारी रोजी 12:30 वाजता मयत घोषित केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मयताची ओळख अद्याप पटली नसून या मयत इस महा बाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश तारव यांनी केले आहे.
———————
