
वाळुज महानगर – “स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या सामाजिक क्रांतीच्या जननी होत्या.” त्यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाला आत्मनिर्भरतेचे साधन मानून, शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र आहे. असे प्रतिपादन प्रा. नसीम शेख यांनी केले.

राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य व विज्ञान महिला वरिष्ठ महाविद्यालय, करमाड येथे क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्यां नसीम शेख होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात प्रा. नसीम शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी उमर शेख, सय्यद अरसलाम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विचार मांडून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
