
वाळुज महानगर, (ता.5) – वाळूज परिसरातील कमळापूर येथे दोन दिवसीय तबलिगी इज्तेमाची सांगता रविवारी 4 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी हजारो मुस्लिम भाविकांनी सामूहिकपणे नमाज पठण केले. या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात 84 मशिदींमधील हजारो मुस्लिम सहभागी झाले होते. 
वाळुज परिसरातील कमळापूर येथे झालेल्या या तबलिगी इज्तेमासाठी 6 एकर शेतजमिनीवर भव्य मंडप उभारण्यात आला होता. तर 6 एकर जागेवर वाहन पार्किंग आणि आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या होत्या. या इज्तेमाची तयारी 21 डिसेंबरपासून सुरू होती. 20 व्या जुम्मा दारो अंतर्गत एकूण 500 स्वयंसेवक दिवसरात्र सेवाकार्यात गुंतले होते. रविवारी 4 जानेवारी रोजी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, वाळुज ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्यासह 6 पोलिस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 37 पोलिस कॉन्स्टेबल आणि वाहतूक पोलिस इज्तेमा परिसरात तैनात होते.
इज्तेमा शांततेत व उत्साहात – या दोन दिवसीय इज्तेमाची सुरुवात शनिवारी 3 जानेवारी रोजी झाली. अस्रच्या नमाजानंतर मौलाना शकूर हदीस साहिब, मगरिबच्या नमाजानंतर मुफ्ती खालिद आणि ईशाच्या नमाजानंतर मौलाना अब्दुल सामी आणि दस्तगीर साहिब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
रविवारी 4 जानेवारी रोजी हा इज्तेमाचा मुख्य दिवस होता. रविवार येथे हजारो मुस्लिम पुरुष जमले होते. दिवसभर मौलानांच्या उपस्थितीत नमाज आणि धार्मिक मार्गदर्शन करण्यात आले. मौलाना जैनुद्दीन साहिब (लातूर) यांनी जुहरच्या नमाजानंतर मार्गदर्शन केले. आणि महाराष्ट्र तबलीगी जमातचे अमीर साहिब यांनी अस्रच्या नमाजानंतर भाषण केले. यानिमित्त सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला.

सामूहिक प्रार्थना –
रविवारी सायंकाळी मगरिबच्या नमाजानंतर मौलाना हुसेन साब (पुनावाले) यांनी इज्तेमात सविस्तर धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यानंतर सामूहिक नमाज पठण करण्यात आली. कार्यक्रमाला हजारो समाज बांधव उपस्थित होते. त्यानंतर तबलिगी इज्तेमा झाला.
हिंदूंनी सुद्धा केली समाजसेवा –
या दोन दिवसीय इज्तेमात रांजणगाव येथील पवननगर येथील नूरानी मस्जिदने 3 क्विंटल तांदळापासून बनवलेला मसाला भात, पोहे आणि फळे वाटप केली. नवाबपुरा येथे अगदी नाममात्र किमतीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा तालुकाधिकारी रमेश अरगडे, विकी वाहुळ, प्रतिष्ठान बकवालनगर आणि नितीन शेजवळ निश्वार्थ जनसेवा फाउंडेशनने इज्तेमा परिसरात वूझूखाना, मोफत दवाखाना आणि मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून इस्तेमातील मुस्लिम बांधवांची सेवा केली होती.
———————–

If you’re feeling lucky Billionaire777vn might be your jam. It’s got that flashy, wealth-focused look that I dig. Worth a try if you think today’s your day to win big bucks. Check it out here: billionaire777vn