February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.7 ) – भरधाव जाणारी ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात गंगापूर वैजापूर रोड हॉटेल वैभव समोर मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी झाला.


या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, या अपघातातील ट्रक गंगापूरकडून वैजापूरकडे जात होती. तर रिक्षा गंगापूर कडे येत होती. या दोन्हीही वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या. 

गंगापूर वैजापूर रोड वरील हॉटेल वैभव समोर मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, सागर खर्डे, अमोल खर्डे, वैभव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गंगापूर घाटी येथे दाखल केले. व त्यानंतर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. ज्योती जराड वय 38, मीरा मोहिते वय 55, ताराबाई जाधव वय 56, लताबाई परमेश्वर वय 44 अशी जखमी महिलांची नावे आहेत. या सर्व महिला गंगापूर येथील आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *