
वाळूज महानगर – नारायणपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिन विरोध होऊन चेरमन व व्हाईस चेरमन यांची निवड सुध्दा बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून के एम चौधरी व गटसचिव आर एस साळुंके यांनी काम पाहिले.
या सोसायटीच्या चेरमनपदी सबजर इब्राहिम पटेल यांची तर व्हाईसचेरमन म्हणून कडू रसूल शेख यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल दोघांचेही स्वागत करण्यात आले. या सोसायटीच्या संचालक मंडळात हाजी शामीर हाजी मोहमद पटेल, हबीब माणिक पटेल, गुलाम अमीर पटेल, जब्बार भिकन पठाण, रामेश्वर नाईक, विठ्ठल कुंजर, बाळासाहेब सातपुते, बुबूबी सांडू शेख, हुजराबी लाल पटेल, रहीम हबीब शेख आदींचा समावेश आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच हाजी नासिर पटेल व संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले.
