February 5, 2026
  1. वाळूजमहानगर – बजाजनगर येथील स्व भैरोमल तनवानी विद्यालयात शिक्षक दिन मंगळवारी (ता.5) सप्टेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी एक दिवसासाठी शिक्षक व मुख्याध्यापक बनले व उर्वरित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

प्रथम पदाधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते माता सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थिनी प्रतिभा पवार हिने तर पर्यवेक्षक म्हणून शिवम आनेराव, साक्षी जाधव, सायली भताने, युवराज बोचरे, आदित्य राठोड यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे या होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी जीवनात शिक्षकांची भूमिका किती महत्वाची हे समजून सांगितले.

 

यावेळी पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, दिगंबर आंबेकर, मीरा आदमाने, मंजुषा चौरे, प्रदीप माळी, सुभाष पाटील, शारदा पगारे, मेघा इटणकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी पवार व अस्मिता कोकाटे या विद्यार्थिनीनी केले तर आभार सोनाली मेरड हिने मानले.

……….

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *