March 25, 2026

आर के भराड, 99 23 27 63 66 –

वाळुज महानगर, (ता.29) – वाळूज परिसरातील आदर्श पाटोदा गावात ग्रामपंचायतने शासकीय योजनांचा लाभ घेऊन विविध उपक्रम राबवले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावाचे नाव राज्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले. याबाबत चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत आदर्श पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या योजनांचे कौतुक रविवारी 29 जून रोजी मन की बात कार्यक्रमातून केले.

पाटोदा म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर वाळूज परिसरातील आदर्श पाटोदा गावाचे चित्र उभे राहते. त्याचे कारण म्हणजे येथील ग्रामपंचायतच्या वतीने विविध शासकीय योजना राबवत राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्काराचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. 2006 मध्ये ग्रामपंचायतला मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्कारामुळे पाटोद्याचे नाव भारतात गणले जाऊ लागले. परिणामी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह भारतातील विविध राज्यातील अनेक मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासह विविध अभ्यासकांनी तसेच विदेशातील सुद्धा काही मान्यवरांनी भेट देऊन गावाची पाहणी केली. या पथकाने नुसती पाहणीच केली नाही, तर आदर्श पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा अभ्यास करून त्यांच्या गावात सुद्धा योजना राबवल्या.

 पंतप्रधानांनी घेतली दखल –
वाळूज परिसरातील आदर्श पाटोदा गावाने राबविलेले विविध उपक्रम, आदर्श गाव म्हणून मिळवलेले नाव लौकिक याची दखल घेत पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची सचित्र माहिती रविवारी 29 जून रोजी मन की बात या कार्यक्रमात दिल्ली.

आदर्श पाटोदा गाव वृत्तवाहिन्यांवर –
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 29 जून रोजी सकाळी मन की बात या कार्यक्रमात आदर्श पाटोदा गावात ग्रामपंचायतने राबविण्यात राबविलेल्या उपक्रमाची सचित्र माहिती दिली. त्यामुळे अनेक वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आदर्श पाटोदा गावाकडे वळले आणि त्यांनी गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दाखवली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *