
वाळूजमहानगर, (ता.15) – घरा शेजारच्या गच्चीवर येऊन दारू पिण्यास पाणी आणून देण्याचे फर्मावले. मात्र पाणी देण्यास नकार दिल्याने पतीला जीवे मारण्याची धमकी देत पत्नीचा विनयभंग केला. हा प्रकार विटावा येथे बुधवारी (ता.15) रोजी पहाटे 12:10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 28 वर्षीय विवाहिता व तिचा पती विटावा येथे घराच्या गच्चीवर झोपलेले होते. त्यांच्या गल्लीत रितू यादव यांचे रो हाऊस आहे. ते सद्या रिकामे आहे. योगेश चिते वय 35 वर्ष, हा नेहमी त्यांच्या गल्लीमधे येत असतो. बुधवारी (ता.15) रोजी रात्री 12.10 वाजेच्या सुमारास ऋतू यादव यांच्या रो हाउसच्या गच्चीवर योगेश चिते हा आला. त्याने विवाहितेच्या पतीला दारू पिण्यासाठी पाणी आणण्याचे फर्मान सोडले. मात्र त्याला नकार दिल्याने चित्ते याने विवाहितेच्या पतीस हाताचपटाने मारहाण केली. त्यांच्या तावडीतुन तिने पतीला सोडवले. त्यावर ते याने तिला शिवीगाळ करून निघून गेला व परत रात्री 1 वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व हात धरून जवळ ओढले आणि विनयभंग केला. म्हणुन ती पतीला हाक मारुन जोरात ओरडले. तेव्हा तिचा पती व शेजारी राहणाऱ्यानी तिला योगेश चिते याच्यापासुन सोडवले. यावेळी योगेश चिते याने तुम्हाला जीवे मारील अशी धमकी दिली व तेथुन निघुन गेला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
