
वाळूजमहानगर, (ता.14) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) परीक्षेचा निकाल सोमवारी 13 मे 2024 रोजी दुपारी जाहीर करण्यात आला. यात बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेचा शंभर टक्के निकाल लागला.
बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेची दहावीची दुसरी बॅच असल्यामुळे निकालाबाबत एक वेगळीच उत्सुकता होती. या दुसऱ्या बॅचचे सर्व विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पाच विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून तर 17 विद्यार्थी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पूर्वा पवार 96.20, सार्थक चाळक 94.40, वेदिका शिंदे 92.80, पूर्वा वाकचौरे 91.60, तेजस्विनी फटांगरे 91.40, साहिल चालक 89.60, तनिष्का बायस 88.40, प्रीती बनकर 87.80, निखिल पवार 87.20, जय कदम 87, सुमित काळे 87, उदय देवकर 86.80, अस्मिता खेडकर 86.40, कृष्णा कळमकर 86.20, सौरभ तांबे 86.20, शरयू जोशी 84.40, कल्पेश नरोडे 84, भूमिका जाधव 83.40, प्रगती शिरसाट 83.20, प्रतीक जाधव 82.60, अभय पगारे 82.60, शिवम जयस्वाल 82 यांचा समावेश आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षीताई भोंडवे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज सावळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा, समन्वय राणी सावंत, समन्वयक गहेना शादिजा आदींनी कौतुक केले.
