March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) -वाळूज औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा या बजाजनगर येथील कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून कामगार पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.
कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी विविध कामगार संघटना कामगार पुतळ्यास अभिवादन करण्यास येणार असल्याने बजाज नगर येथील कचरा संकलन करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे व्यवस्थापक शैलेंद्र चांदस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी शंकर साबळे, लखन डाके यांनी चार चाकी वाहनातून पाणी आणून कामगार पुतळ्याची व परिसराची स्वच्छता केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *