March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1)- प्रसन्न शिक्षण संस्था संचलित आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन बुधवारी (ता.1) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शाळेच्या संचालक प्रभाकर म्हस्के, संस्थेचे अध्यक्षा निर्मला म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के व श्रद्धा म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सामूहिक राष्ट्रगान घेण्यात आले. व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती यादव, मयुरा आष्टणकर, सुवर्णा धकीते, रत्नप्रभा पाटील, मोनिका निर्मले, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, अभिषेक गौंड, कविता भराडे, अश्विन चव्हाण, कविता शर्मा, रुचिका मेहेत्रे, जया पगारे, जयश्री केले, आरती खंडागळे, योगेश सोनकांबळे, परमेश्वर तवार आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *