March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.30)- पाठीमागे कोणी आहे की नाही, हे न पाहता निष्काळजीपणा करून कंटेनर पाठीमागे घेऊन जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज येथील टी सी आय ट्रान्सपोर्ट येथे झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड येथील शहादेव महादेव जगदाळे वय 54 वर्षे हा वाळुज येथील ट्रान्सपोर्ट येथे चालक म्हणून काम करतो. शुक्रवारी (ता.26) रोजी जगदाळे हा टी सी आय ट्रान्सपोर्ट येथील झाडाखाली आराम करत होता. त्याचवेळी आरोपी रामा शंकर हा कंटेनर (यु के 06, 8109) चा चालक तेथे आला. आणि पाठीमागे कोणी आहे की नाही, हे न पाहता त्याच्या ताब्यातील कंटेनर निष्काळजी पणाने पाठीमागे घेतली. दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात शहादेव जगदाळे याचे दोन्ही पाय, छाती व कंबरेला जबर मार लागल्याने फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शहादेव जगदाळे यांच्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी रामाशंकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमराव शेळके करीत आहे.
            वाहन चालकांमध्ये खळबळ –
वाळूज येथील टी सी आय ट्रान्सपोर्ट येथे झालेली ही घटना घडली असून खरोखरच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की, जाणून बुजून कंटेनर चालकाने टी सी आय ट्रान्सपोर्टच्या वाहन चालकाच्या अंगावर कंटेनर घालून अपघात झाल्याचा बनाव केला. याबाबत उलट सुलट चर्चा असून वाहन चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *