March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.24)- वाळूज ते लिंबे जळगाव दरम्यान पडित जमिनीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या त्या इसमाची ओळख पटली. प्रकरणात 24 तासाच्या आत वाळूज पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे त्याने आत्महत्या केल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. असे पोलिसांनी सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील हॉटेल नवनिर्माण समोरील पडित जमिनीतील एका लिंबाच्या झाडाला अंदाजे 45 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आढळून आला होता. वाळूज पोलिसांनी अनुभवाचे कौशल्य वापरून त्या मयताची ओळख घटनेनंतर अवघ्या 24 तासाच्या आत पटवली. त्याचे नाव रामभाऊ दगडू जोशी वय 42 वर्ष रा. दरकवाडी (करमाडजवळ) तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्याचे सेवविच्छेदन केले असता गळफास घेतल्याने मृत्यु आला. असा अहवाल डॉक्टरांनी दिला. असे वाळुज पोलिसांनी सांगितले. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे गुढ अद्यापही गुलदस्त्यात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दशरथ खोसरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *