March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.24) -वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी येथील 14 वर्षीय मुलीचे रांजणगाव (शेणपुंजी) येथील यात्रेतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी अपहरण केले. शुक्रवारी (ता.19) रोजी दुपारी हा प्रकार घडला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी रांजणगाव (शेणपुंजी) येथे यात्रेला जाते असे म्हणून शुक्रवारी (ता.19) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गेली. ती अद्यापही घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी परिसरात व नातेवाईकांकडे तसेच मैत्रिणीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी तिला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले असावे. असा संशय असल्याने मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.24) रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *