
वाळुज महानगर, (ता.23)- गावात लग्न आहे. ते मी लावुन येतो म्हणुन तुर्काबाद (खराडी) तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेत वस्तीवर राहणारा गणेश शेषराव पाटेकर (वय 42) हा रविवारी (ता.21) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घरातुन गेला.
तो तेव्हांपासुन अद्यापपावेतो घरी आला नाही. त्यामुळे त्याचा नातेवाईकांकडे, त्याच्या मित्रांकडे व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला. मात्र तो अद्याप मिळुन आली नाही. याप्रकरणी शेषराव भाऊसाहेब पाटेकर, (वय 66) रा. तुर्काबाद (खराडी) ता. गंगापुर, छ. संभाजीनगर दिलेल्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गणेश पाटेकर हा हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा शोध पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दशरथ खोसरे घेत आहे.
बेपत्ता शेतकऱ्याचे वर्णन असे –
नाव – गणेश शेषराव पाटेकर, वय -42 वर्ष, व्यवसाय शेती, रा. तुर्काबाद (खराडी) शेत वस्ती, केस -काळे, उंची 5.8 फुट, रंग गोरा, बांधा मजबूत, अंगात ग्रे कलरचा शर्ट, काळ्या कलरची पॅन्ट, पायामध्ये बुट, भाषा मराठी, हिंदी बोलतो.
