March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.24) -सिडको वाळूज महानगरातील जयमल्हार चौकामध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी चारचाकी गाडीला बांधून ओढून नेल्याची घटना सोमवारी (ता.22) रोजी सकाळी उघडकीस आली. या एटीएममध्ये 7 लाख 46 हजार 100 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत आले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको वाळूज महानगरमधील जयमल्हार चौकामध्ये एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. बाजूलाच माणिक शिंदे यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे, नियमितपणे शिंदे यांनी आपले दुकान उघडले. यावेळी त्यांना बाजूला असलेले एटीएम फोडलेले दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या एटीएम मध्ये सात लाख 46 हजार 100 रुपये होते असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, प्रशांत सोनवणे, शरद वेताळ, गोकुळ जोशी, गणेश सागरे, गोरखनाथ कडू, आत्माराम बोराडे, नितीन इनामे, लखन गुशिंगे आदींनी या घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडूळे, पोलीस अंमलदार राजाराम डाखोरे, पोलीस हवालदार व्ही पी निकम, मनगटे, रवी खरात यांच्यासह सुहाने पथक तसेच तज्ञ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली.

घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत -शेजारी असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रण आले असून त्यात तीन चोरटे दिसत आहे. पहाटे 3:15 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनातून तीन चोरटे येतात. पाहणी करून एटीएम मशीन घेऊन पळ काढतात. सुमारे एक तास चाललेल्या या घटनेचे चित्रण सीसीटीव्ही आलेले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *