March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढून प्रभू श्रीरामाचा जयजयकार करत बजाजनगर येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बुधवारी (ता.17) रोजी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भव्य राम मंदिर देखावा सर्वांचे आकर्षण ठरला.

प्रथम प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे भाजपा सरचिटणीस अनिल चोरडिया, संतोष चोरडिया, भूमिपुत्र सामाजिक संस्था अध्यक्ष पोपटराव आदिक, अर्जुन आदमाने, कैलास भोकरे, काकासाहेब चेळेकर, सतीश पाटील, मयूर चोरडिया, अमित चोरडिया, दादासाहेब खणसे, सरपंच सुनील काळे, विजय सरकटे, दशरथ मुळे, प्रेम जाधव, तारासिंग तरैयावाले, संजय पेरे, भगवान ढेरंगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.

जय श्रीराम, जय जय श्रीराम. असा जयघोष करत व विविध घोषणा देत बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतून निघालेली ही शोभायात्रा, राम मंदिर, जय भवानी चौक, आम्रपाली बुद्ध विहार, गोरख वाघ चौक, त्रिमूर्ती चौक, गणपती मंदिर, वडगाव फाटा, मोहटा देवी मंदिर, जागृत हनुमान मंदिर या मार्गाने काढण्यात आली.

प्रभू श्रीरामाची आकर्षक प्रतिमा, भव्य राम मंदिर देखावा. हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी जिल्हा संयोजक सुमित चोरडिया, भाजपा उद्योग आघाडी गंगापूर अध्यक्ष आश्विन आदिक, आनंद संचेती, हर्ष चोरडिया, राम झांबरे, जिगर गावडे, सुरज सोळुंके, गजानन भागवत, अरविंद शेलार, आदित्य राठोड आदींसह सकल हिंदू समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *