March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17)- भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त बी पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी बी पँथर सामाजिक संघटनाचे अध्यक्ष तथा ऍड अनिलकुमार बस्ते, महासचिव भीमराव गाडेकर, उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे, कोषाध्यक्ष विजय मगरे, मराठवाडा कार्याध्यक्ष राजेंद्र बनसोडे, जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे, डॉ पंढरीनाथ प्रधान, ऍड कैलास सोनुने, ज्ञानेश्वर शेजुळ, महिला आघाडीच्या बेबी प्रधान व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *