
वाळुज महानगर, (ता.16)- श्रीराम नवमी निमित्त वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिर, कलानगर शिवाजीनगर परिसर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता.17) रोजी करण्यात आले आहे.
प्रथम सकाळी श्रीराम मूर्ती अभिषेक करण्यात येऊन महापूजा व प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अन्नदाते मंगेशभाऊ वादवाणी साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
