March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.14) – बजाजनगर येथे माहेश्वरी महिला मंडळ, वाळुजच्या वतीने भव्य सवाद्य कलश मिरवणूक काढून गणगौर हा सोहळा गुरुवारी (ता.11) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माहेश्वरी समाजाचा प्रमुख सण म्हणजे गणगौर, होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गुढीपाडव्यापर्यंत म्हणजेच 16 दिवस चालणाऱ्या या गणगौर उत्सवात दररोज होणाऱ्या कार्यक्रमात राजस्थानी नृत्य, घुमर, नाटिका, गौरा विवाह असे कार्यक्रम सादर करतात. यावेळी काढण्यात येणाऱ्या गणगौर मिरवणुकीत कुमारिका तसेच विवाहित महिला आपल्या माहेरी अथवा सासरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. गौरीचे पूजन करून आपल्या सौभाग्याचे लेणे मागतात.

या सणाचे औचित्य साधून माहेश्वरी महिला मंडळ वाळुजच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी (ता.11) रोजी बजाजनगरातील गणपती मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक बजाजनगरातील गोरख वाघ चौक, महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर अशा प्रमुख मार्गावरून जाऊन उमा भन्साळी यांच्या निवासस्थानाजवळ गणगौरची आरती होऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

मिरवणुकीत समाजबांधवांच्या वतीने ठिकठिकाणी शीतपेय व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाळूज माहेश्वरी मंडळाच्या विजया काबरा, रचना मालपाणी, शीतल मोदाणी, किरण राठी, राखी लाहोटी, हिरा मालपाणी, विद्या सारडा आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *