March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – कंपनीच्या सुपरवायझरने ऑफिसमध्ये बोलावून एका 21 वर्षीय महिला कामगारालाचा विनयभंग केला. दहा ही घटना 10 एप्रिल रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील दिवन इंजिनिअरींग या कंपनीत 21 वर्षीय पिडीत महिला नव्यानेच रूजू झाली होती. 10 एप्रिल रोजी पिडीत महिला सीएनसी मशिनवर ऑपरेटरचे काम करत असताना सुपरवायझर आरोपी नारायण गावंडे (35) रा.सारंगपूर ता. गंगापूर हा तिच्या जवळ आला. त्याने पाणी घेवून महिलेला ऑफिसात बोलावले. पाण्याचा ग्लास घेते वेळी आरोपीने महिलेला जवळ ओढून तिच्याशी अश्लील चाळे करत तिच्या मनास लज्जा वाटेल असा संवाद साधला. यावेळी जबरदस्ती केल्याने महिलेचे ब्लाउज फाटले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी नारायण गावंडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *